ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 2 कोटी 91 लाख 90 हजार 543 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 कोटी 10 लाख 33 हजार 237 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
रविवारी जगभरात 2 लाख 43 हजार 969 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 3905 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 9 लाख 28 हजार 344 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 72 लाख 28 हजार 962 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 60 हजार 513 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 67 लाख 08 हजार 458 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 39 लाख 74 हजार 949 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 98 हजार 520 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 48 लाख 46 हजार 427 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 37 लाख 80 हजार 107 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 79 हजार 754 जणांचा मृत्यू झाला आहे.









