ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात 9 कोटी 91 हजार 917 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 19 लाख 35 हजार 051 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शनिवारी जगभरात 7 लाख 27 हजार 131 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 12 हजार 437 रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 9 कोटी बाधितांपैकी 6 कोटी 44 लाख 88 हजार 484 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 2 कोटी 36 लाख 68 हजार 382 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामधील 1 लाख 08 हजार 543 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, अमेरिकेत 2 कोटी 26 लाख 99 हजार 938 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 33 लाख 93 हजार 078 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 लाख 81 हजार 480 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 1 कोटी 04 लाख 51 हजार 346 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 1 कोटी 75 हजार 950 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 51 हजार 048 जणांचा मृत्यू झाला आहे.









