नवी दिल्ली
जगभरात सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलेला नॉन गेमिंग ऍप म्हणून जानेवारी2021 मध्ये ‘टेलीग्राम’ची नेंद करण्यात आली आहे. सेंसर टॉवरच्या अहवालानुसार 24 टक्क्यापर्यंत डाऊनलोड भारतामध्येच करण्यात आल्याचे सांगितले आहे. मॅसेजिंग ऍपला मागील महिन्यात 6.3 कोटींवेळा डाऊनलोड करण्यात आले होते. जानेवारी 2020 च्या तुलनेत सदरचे डाऊनलोड हे 3.8 पटीने अधिक राहिले आहे. डाऊनलोडमध्ये अचानक आलेल्या वृद्धीच्या कारणास्तव व्हॉटसऍपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी असल्याचे मानले जात आहे. यादीमध्ये दुसऱया स्थानी टिकटॉक आहे, यानंतर सिग्नल आणि फेसबुकने आपली जागा बनवली आहे. व्हॉटसऍप तीन वरुन पाचव्या स्थानी पोहोचला आहे. ‘टॉप ऍप्स वर्ल्डवाईड फॉर जानेवारी-2021 बाय डाऊनलोड्स’ नावाने आपला लेटेस्ट ब्लॉग पोस्टमध्ये, सेंसर टॉवरने घोषणा केली होती, की टिकटॉक आणि सिग्नल यांना पाठीमागे टाकत टेलीग्रामने चालू वर्षातील पहिल्या महिन्यात जानेवारीत जगातील सर्वाधिक डाऊनलोड ऍपमध्ये महत्वाचे स्थान पटकावले आहे. सेंसर टॉवरनुसार डिसेंबर 2020 मध्ये डाऊनलोडमध्ये टिकटॉक सर्वोच्च स्थानी होते. या तुलनेत टेलीग्राम पहिल्या पाचमध्येही स्थान पटकावले नव्हते. व्हॉट्सऍप पॉलिसीवादानंतर ग्राहकांनी जानेवारीत टेलीग्रामला पसंती दर्शवली होती.









