ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 11 कोटी 71 लाख 43 हजार 087 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 26 लाख 01 हजार 164 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 9 कोटी 27 लाख 12 हजार 046 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 2 कोटी 18 लाख 29 हजार 877 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 89 हजार 496 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटी 96 लाख 53 हजार 891 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 5 लाख 37 हजार 119 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात 1 कोटी 12 लाख 10 हजार 799 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 1 लाख 57 हजार 791 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबळींच्या संख्येत ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये 1 कोटी 09 लाख 49 हजार 320 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 2 लाख 64 हजार 446 जण दगावले आहेत.









