ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 12 कोटी 88 हजार 137 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 26 लाख 60 हजार 356 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शनिवारी जगभरात 4 लाख 42 हजार 498 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 08 हजार 140 रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 12 कोटी रुग्णसंख्येपैकी 9 कोटी 66 लाख 13 हजार 180 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. अजूनही 2 कोटी 08 लाख 14 हजार 601 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामधील 89 हजार 295 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.









