ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात 9 कोटी 54 लाख 94 हजार 097 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 20 लाख 39 हजार 918 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
रविवारी जगभरात 5 लाख 32 हजार 236 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 9 हजार 192 रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 9.54 कोटी बाधितांपैकी 6 कोटी 82 लाख 09 हजार 787 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 2 कोटी 52 लाख 44 हजार 392 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामधील 1 लाख 13 हजार 153 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, अमेरिकेत 2 कोटी 44 लाख 82 हजार 050 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 44 लाख 58 हजार 351 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 लाख 07 हजार 202 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 1 कोटी 05 लाख 72 हजार 672 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 1 कोटी 02 लाख 11 हजार 342 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 50 हजार 456 जणांचा मृत्यू झाला आहे.









