ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात 11 कोटी 13 लाख 32 हजार 696 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 8 कोटी 62 लाख 44 हजार 386 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शुक्रवारी जगभरात 4 लाख 03 हजार 520 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 11 हजार 046 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जगभरात 2 कोटी 26 लाख 22 हजार 783 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामधील 94 हजार 527 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनाने आतापर्यंत जगात 24 लाख 65 हजार 527 जणांचा बळी घेतला आहे.
कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत 2 कोटी 86 लाख 03 हजार 813 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 88 लाख 03 हजार 723 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 5 लाख 07 हजार 746 जणांचा मृत्यू झाला आहे.