ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पावणेचार कोटींच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. जगात आतापर्यंत 3 कोटी 74 लाख 70 हजार 884 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 10 लाख 77 हजार 507 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शनिवारी जगभरात 3 लाख 55 हजार 878 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 5075 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 3.74 लाख बाधितांपैकी 2 कोटी 81 लाख 16 हजार 079 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 82 लाख 77 हजार 298 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 68 हजार 619 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 79 लाख 45 हजार 505 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 50 लाख 89 हजार 842 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 19 हजार 282 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 70 लाख 53 हजार 806 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 60 लाख 77 हजार 976 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 08 हजार 371 जणांचा मृत्यू झाला आहे.