ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 3.25 कोटींवर पोहचली आहे. जगात आतापर्यंत 3 कोटी 27 हजार 65 204 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 9 लाख 93 हजार 463 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शुक्रवारी जगभरात 3 लाख 18 हजार 804 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 5818 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3.27 लाख बाधितांपैकी 2 कोटी 41 लाख 78 हजार 346 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 75 लाख 93 हजार 395 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 63 हजार 876 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 72 लाख 44 हजार 184 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 44 लाख 80 हजार 719 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 08 हजार 440 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 59 लाख 03 हजार 932 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 48 लाख 49 हजार 584 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 93 हजार 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









