ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या दीड कोटींवर पोहचली आहे. जगात आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 97 हजार 696 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 6 लाख 19 हजार 561 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मंगळवारी जगभरात 2 लाख 39 हजार 113 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 5678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1.50 लाख बाधितांपैकी 91 लाख 15 हजार 482 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 53 लाख 62 हजार 653 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 63 हजार 646 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 40 लाख 28 हजार 569 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 18 लाख 86 हजार 683 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 44 हजार 953 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 21 लाख 66 हजार 532 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 14 लाख 65 हजार 970 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 81 हजार 597 जणांचा मृत्यू झाला आहे.









