ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात कोरोनाने 10 लाखांहून अधिक बळी घेतले आहेत. जगात 3 कोटी 33 लाख 06 हजार 022 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यामधील 10 लाख 02 हजार 389 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2 कोटी 46 लाख 37 हजार 458 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 76 लाख 66 हजार 175 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 65 हजार 129 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 73 लाख 21 हजार 343 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 2 लाख 09 हजार 453 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात 60 लाख 74 हजार 702 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 50 लाख 16 हजार 520 कोरोनामुक्त झाले आहेत. 73 हजार 923 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबळींच्या संख्येत ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये 47 लाख 32 हजार 309 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 41 हजार 776 जण दगावले आहेत.









