कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात केवळ भारतातच नव्हे तर आर्थिकदृष्टय़ा सबळ असणाऱया देशांमध्येही महागाईचा आगडोंब उसळला आहे. कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था डळमळीत झाल्याने मागणी आणि पुरवठा यांचा समन्वय तुटला आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये वस्तू उपलब्ध असूनही त्या ग्राहकांपर्यंत न पोचल्याने महागाई वाढली आहे, असे दिसून येत आहे. गेल्या आठवडय़ात अमेरिकन सरकारच्या कामगार विभागाने यासंबंधीचा अहवाल सादर केला असून ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेतील महागाई वाढीचा दर 6.2 टक्क्मयांवर पोहोचल्याचे स्पष्ट केले आहे. याच महिन्यात भारतातही महागाई वाढीचा दर 4.5 टक्के होता.
तथापि, अमेरिकेतील महागाई आणि भारतातील महागाई यात एक गुणात्मक फरक आहे. भारतात महागाई वाढीचा दर 6 टक्क्मयांहून अधिक झाला तरी वस्तूंच्या किमती अमेरिकेच्या तुलनेत फार मोठय़ा प्रमाणात वाढत नाहीत. तथापि, अमेरिकेमध्ये याच्या वितरित परिस्थिती आहे. भारतात दरवषी विशिष्ट प्रमाणात महागाई वाढत असते. अमेरिकेत मात्र बरीच वर्षे जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहिल्यानंतर आता अचानक त्यात वाढ झाल्याने महागाईच्या झळा अधिक पोचत आहेत. एकंदरीत कोरोना उदेकामुळे अर्थकारणावरही जो विपरित परिणाम घडविला आहे, त्याच्यातून बाहेर येण्यास जगाला बरीच झुंज द्यावी लागणार, याची चिन्हे या आकडेवारीतून समोर येत आहेत.









