प्रतिनिधी / बार्शी
बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल दवाखान्यातील अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. कोरोना रुग्णांना उपचार करण्यासाठी हे हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून शासनाने मंजूर केलेले आहे. या दवाखान्यामध्ये बार्शी व शेजारील तालुक्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. आज दुपारी चारच्या आसपास एका अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना घडली.
अतिदक्षता विभागातील एका खोली मधून अचानक धूर येत असल्याचे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आल्याने अग्निशामक दलाला पाचारण केले गेले प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे समजले आहे. परंतु तात्काळ ती आग रोखण्यात यश आल्याने अनेक रुग्णांच्या व नातेवाइकांचे जीवितास कोणताही धोका झालेला नसून सर्व रुग्ण व नातेवाईक सुरक्षित आहेत. ही बाब लक्षात येताच हॉस्पिटल प्रशासनाने तात्काळ या अतिदक्षता विभागातील रुग्णांना दुसऱ्या अतिदक्षता विभागामध्ये स्थलांतरित केलेले आहे.
Previous Articleझी मराठीवर पहिला वजनदार डान्सिंग शो
Next Article महास्वच्छता अभियानातून कोरोना प्रतिबंधाबाबत जनजागृती









