अजितदादांचा दौरा झाल्याबरोबर बॉन्सर तेच फक्त एजन्सी बदलली
प्रतिनिधी/ सातारा
दोन दिवसांपूर्वी साताऱयाच्या जंबोत सदरबाजारातील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांना ही बातमी समजताच त्यांनी आपल्या अश्रूंचा बांध जंबोबाहेरच फोडला. तेवढय़ात ताडमाड असलेले बॉन्सर आले अन् त्यांनी येथे रडू नका, अशी सक्ती त्यांना केली. दोन दिवसांपूर्वी अजितदादा आले अन् दुसऱया दिवशी त्या बॉन्सरचे सुरक्षा रक्षक झाले. एजन्सी मात्र बदलली पोरं तीच अशी अवस्था आहे. दरम्यान, आतील तर विदारक स्थिती असून अगदी मृत रुग्णही तास नं तास रुग्णांच्या शेजारीच पडून असतात. त्यामुळे रुग्णांच्या मनात घृणा निर्माण होते अशी तेथून बाहेर पडलेल्या अनेक रुग्णांनी व्यथा सांगितली.
जंबो कोविड हॉस्पिटल गतवर्षीपासून साताऱयातील दानशुर व्यक्तीच्या सहकार्यातून आणि प्रशासनाच्या मदतीने उभे राहिले. परंतु गतवर्षीपासूनच जंबो कोविडमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे. अगदी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांवर नेमके काय उपचार सुरु आहे हे नातेवाईकांना काहीच कळत नाही. नातेवाईक मात्र बाहेरुनच संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. आतमध्ये खरच रुग्णाला व्हेंटीलेटर लावले आहे काय?, ऑक्सिजन लावले आहे काय?, त्यास वेळेवर गोळय़ा औषधे दिली जातात काय?, वेळेवर जेवण असते काय?, तेथील शौचालयाची स्वच्छता केली जाते काय अशी सगळी प्रश्नांची मालिकाच आहे. परंतु त्याच बरोबर मृत झालेला रुग्णही कित्येक तास बेडवर तशाच अवस्थेत पडून असतो. त्यामुळे शेजारच्या बेडचा धडधाकड रुग्णही हबकी खावून बरा होण्याऐवजी आणखी नैराशेत जावून त्या रुग्णाचा आजार बरा होण्याऐवजी बळावत आहे. त्यामुळे जंबोत उपचार घेत असलेल्या रुग्णांनाच लवकर बाहेर सुटका होवू द्या असे वाटत असते. असे अनेक तेथून बाहेर पडलेल्या रुग्णांनी सांगितले. तसेच रुग्णांलयात दोन दिवसांपूर्वी एका सदरबाजार येथील रुग्णाचा मृत्यू झाला. ही बातमी त्याच्या दोन मुलांना समजताच त्यांनी जंबो बाहेरच त्यांनी रडारड सुरु केली. तोच ताडमाड व आडदांड बाऊंसर आले. त्यांनी येथे रडायचे नाही असे सांगत तेथून दुर जाण्याच्या सुचना केल्या. ते दुखीत कुटुंब बाजूला जावून आपले दुख हलके करत होते. म्हणजे एकूणच जंबोमध्ये आतमध्ये काय चालते याकरता सीसीटीव्ही कॅमेर बसवण्यात यावेत. नेमके रुग्णांवर उपचार होतात की नाही याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
बाऊंसर तेच फक्त नाव बदलले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी कानपिचक्या आरोग्य विभागाच्या घेतल्यानंतर दुसऱया दिवशी त्या बॉन्सरचे सुरक्षा रसक्षक झाले. एजन्सी देण्यात आली. त्यामुळे बाऊन्सर तेच फक्त बाऊन्सरचे झाले सुरक्षा रक्षक झाल्याचे सातारकरांनी पाहिले.








