उदय सावंत /सोलये.
गेल्या एक तपापासून रानटी जनावरांचा अधिवास लोकवस्तीमध्ये वाढू लागला आहे .यामुळे रानटी जनावरे व मानवी संघर्ष हळूहळू विकोपाला जाताना दिसत आहे. यामागची कारणे अनेक असली तरीसुद्धा मानवाचे अतिक्रमण जैविक संपत्तीमध्ये होऊ लागल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू लागले आहेत. 1 महिन्यापूर्वी होंडा सत्तरी येथील सोलये भागांमध्ये गजानन मराठे यांच्या घरांमध्ये बिबटय़ा शिरून गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पुन्हा एकदा याच बिबटय़ाने त्याच्याच घरांमध्ये आज सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घुसून पुन्हा एकदा गावांमध्ये भितीचे वातावरण पसरविलेले आहे .सदर घरामध्ये बिबटय़ा घुसल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या माध्यमातून उघडकीस आलेली आहे .यामुळे पुन्हा एकदा रानटी जनावरे व मानवी संघर्ष यासंदर्भाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. याबाबतची माहिती अशी की सोलये याठिकाणी गजानन मराठे यांच्या घरात 1 महिन्यापूर्वी बिबटय़ा घुसल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या माध्यमातून उघडकीस आले होते. एक महिन्यानंतर पुन्हा एकदा याच बिबटय़ाने त्याच्या घरामध्ये घुसून गावामध्ये खळबळ माजवून दिलेली आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुका हा पूर्णपणे डोंगराळ व घनदाट जंगल संपत्तीने भरलेला आहे. या जंगलांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारची रानटी जनावरे आहेत. मात्र ही जनावरे हल्लीच्या काळात लोकवस्तीमध्ये घुसू लागलेली आहेत. जंगलामध्ये काँक्रिटीकरण हळूहळू वाढू लागलेली आहे. यामुळे रानटी जनावरांचा अधिवास असुरक्षित बनू लागल्यामुळे ही जनावरे आपल्या खाद्याच्या शोधासाठी लोकवस्तीमध्ये घुसू लागलेली आहेत. होंडा सत्तरी याठिकाणी घडलेला प्रकार याचाच भाग असल्याचे नागरिकांचे मत आह.
होंडा सोलये भाग उध्वस्त चिरेखाणी, बेसुमार खाण उत्खननाचा बळी.
होंडा पंचायत क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात खाणीचा व्यवसाय सुरू होता. अनेक वर्षापासून या ठिकाणी बेसुमारपणे खनिज उत्खनन होत असल्यामुळे या भागातील मोठय़ा प्रमाणात पर्यावरणाची नाशाडी झालेली आहे .घनदाट जंगलाची जागा आता खनिज उत्खननाच्या खंदकानी घेतलेली आहे. यामुळे या ठिकाणी अनेक वर्षे वास्तव्य असलेले बिबटे, पट्टेरी वाघ यांचा अधिवास धोक्मयात आलेला आहे. त्यांना आवश्यक स्वरूपाचे खाद्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्यामुळे खाद्याच्या शोधासाठी ते आता लोकवस्तीमध्ये लागलेले आहेत.
यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार हल्लीच्या काळात सदर भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात चिरेखाणीचा व्यवसाय सुरू आहे. बेकायदेशीरपणे असलेल्या चिरेखाणीवर सरकारचे अजिबात नियंत्रण नसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर जंगलतोड करून रानटी जनावरांचा समोर यक्षप्रश्न निर्माण करण्यात आल्यानंतर त्याचे प्रतिकूल परिणाम रानटी जनावरे लोकवस्तीमध्ये घुसण्याच्या प्रकारांमध्ये होऊ लागलेले आहेत. गजानन मराठे यांच्या घरांमध्ये घुसलेला बिबटा हा याचाच परिपाक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सोलये गावाच्या शेजारी संपूर्णपणे खनिज उत्खननाने हाहाकार माजविला आहे .यामुळे या ठिकाणी वास्तव्यास असलेले बिबटे पट्टेरी वाघ हे आता हळूहळू कमी होऊ लागलेले आहे. जे बिबटे शिल्लक आहेत त्यांना आपल्या उदरनिर्वाहाची चिंता निर्माण झाल्यामुळे लोकवस्तीमध्ये घुसून कुत्रे व कोंबडय़ावर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी बिबटे लोकवस्तीत घुसत असल्याचे पर्यावरण प्रेमींचे मत आहे.
याला जबाबदार कोण ?
खनिज उत्खननाच्या माध्यमातून झटपट गर्भ श्रीमंत होण्याच्या लालसेपायी होंडा गाव आता हळूहळू भौगोलिक दृष्टय़ा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सोलये हा पूर्णपणे खनिज खाणीच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे असुरक्षित बनलेला आहे. अनियोजित खनिज उत्खनन व बेसुमारपणे चिरेखाण यांचा व्यवसाय त्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱया काळात सोलये गावावर मोठे संकट निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. ज्यावेळी बेकायदेशीरपणे चिरेखाणीचा व्यवसाय व खनिज मालाचे उत्पादन यासंदर्भात स्थानिकानी आवाज उठविणे गरजेचे होते. मात्र झटपट गर्भ श्रीमंत होण्याच्या लालसेपायी याकडे दुर्लक्ष करण्यात आले व त्याचे प्रतिकूल परिणाम आज रानटी जनावरे घरामध्ये घुसण्याच्या प्रकारातून होऊ लागलेले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरेच्या माध्यमातून प्रकार उघडकीस.
दरम्यान यासंदर्भात नागरिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 20 जून रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सदर बिबटय़ा गजानन मराठेच्या घरात घुसला. यासंदर्भात संशय आल्यानंतर मराठे कुटुंबीयांनी सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या माध्यमातून खात्री करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबटय़ा घुसल्याचे उघडकीस आले. यामुळे नागरिकांचे सध्यातरी खळबळ निर्माण झालेली आहे. एक महिन्यापूर्वी बिबटय़ा घुसल्याने भीती निर्माण झाली होती. यासंदर्भात तक्रार वनखात्याच्या यंत्रणेला करण्यात आली होती. त्यावेळी वनखात्याने ही बाब गांभीर्याने घेतली असती तर पुन्हा बिबटय़ा घरात घुसण्याचा प्रकार घडला नसता. मात्र त्यांनी यासंदर्भात दुर्लक्ष केल्याचा आरोप सोलये गावातील ग्रामस्था?नी केला आहे. सदरवेळी पिंजरा लावून बिबटय़ाला जेरबंद करण्याची गरज होती असे ग्रामस्था?नी यावेळी स्पष्ट केले.









