साहित्य : छोले बनविण्यासाठीः 2 वाटी वाफवलेले छोले, 1 चमचा तेल, 2 कांदे चिरून, 1 चमचा धणेजिरेपूड, 2 चमचे लाल तिखट पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, पाव चमचा गरम मसाला पावडर, 2 चमचे टोमॅटो केचप, मीठ, टीक्कीसाठीः 2 बटाटे वाफवून, अर्धी वाटी मटार वाफवून, 1 चमचा जिरे, 2 चमचे तेल, अर्धा चमचा कलोंजी, 2 हिरवी मिरची चिरून, पाव चमचा काळीमिरी पावडर, 1 चमचा कोथिंबीर चिरून, 1 चमचा कॉर्नफ्लोर, मीठ, 1 चमचा आमचूर पावडर, तेल, चाटसाठीः 8 चमचे दही, 6 चमचे ग्रीन चटणी, 4 चमचे गोड चटणी, 8 चमचे नायलॉन शेव
कृती : गरम तेलात कांदा गुलाबी रंगावर परतवून त्यात छोले साहित्य घालून दोन मिनिटे परतवावे. दुसऱया कढईत गरम तेलात जिरं, कलोंजी टाकावे. नंतर टीक्कीचे साहित्य मिक्स करून मिश्रण चांगले मॅश करून घ्यावे. गार झाले की टिक्की बनवून गरम तव्यावर तेलाचे थेंब पसरवून शालोफ्राय करावेत. आता तयार टीक्की बाऊलमध्ये घेऊन त्यावर छोले घालावे. नंतर त्यावर दही, ग्रीन चटणी, गोड चटणी आणि नायलॉन शेव घालावे. आता तयार चाट खाण्यास द्या.









