वडगाव येथील घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
सासरच्या मंडळींनी हुंडय़ासाठी केलेल्या छळाला कंटाळून येळ्ळूर रोड, वडगाव येथील एका विवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह चौघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दीपा राजेश होसमनी (वय 26) असे त्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. केवळ दीड वर्षापूर्वी राजेशबरोबर तिचे लग्न झाले होते. दीपाचे माहेर तानाजी गल्ली येथील असून लग्नानंतर हुंडय़ासाठी तिचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळून दीपाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे.









