वरकुटे-मलवडी / वार्ताहर :
माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील आबा अशोक चव्हाण यांच्या छप्पराला आग लागून सहा शेळ्या दगावल्या असून, संसारोपयोगी साहित्यही जळून खाक झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, आबा चव्हाण हे वरकुटे-मलवडी हद्दीतील डूंबा नावाच्या शिवारात आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांनी ६ शेळ्या पाळल्या होत्या. बुधवारी सकाळी १०.३० वा. अचानक राहत असलेल्या छप्पराला आग लागली. यात सहा गाभण शेळ्या जाग्यावरच जळून खाक झाल्या. तसेच घरातील सर्व साहित्य, धान्य, कपडे जळून राख झाली. या आगीत चव्हाण यांचे सुमारे ८० ते ९० हजाराचे नुकसान झाले आहे. आबा चव्हाण व त्यांचे कुटुंंब या आगीपासून थोडक्यात बचावले आहे. त्यांना वरकुटे – मलवडी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.









