दिल्ली \ ऑनलाईन टीम
छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्यामध्ये औषधं आणण्यासाठी गेलेल्या एका तरूणाचा जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी मोबाईल फोडून त्याला कानशिलात लावल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृत्यावर आता आयएएस असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. हेकृत्य नागरी सेवेच्या मूलभूत नियमांच्या विरोधात असल्याचं आयएएस असोसिएशनने म्हटलं आहे.
आयएएस असोसिएशनने ट्वीट करत म्हटले आहे की, सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे कृत्य केले आहे ते अस्वीकाहार्य आणि सेवेच्या मूलभूत नियमांच्या विरोधात आहे. सनदी अधिकाऱ्याने नेहमी सहानुभूतीने वर्तन केलं पाहिजे आणि अशा कठीण परिस्थितीत समाजाशी संवेदनशील राहिलं पाहिजे. आयएएस असोसिएशन या कृत्याचा निषेध करत आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायर झाला. अनेकांनी सोशल मीडियावर आयएएस असोसिएशला टॅग करुन यासंबंधी जाब विचारला. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री बघेल यांनी कारवाई करावी, अशी मागणीही काही नागरिकांनी केली. यानंतर जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी या घटनेवर माफी देखील मागितली आहे.