ऑनलाईन टीम / रायपुर :
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, माझ्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्याने मी माझी कोरोना चाचणी केली. त्यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःला क्वारंटाइन करावे तसेच स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सद्य स्थितीत 84,234 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 664 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर आता पर्यंत 46,081 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.