सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्याची चौपाटी नुसतं नाव घेतलं तरी सातारकरांच्या जिभेवर लगेच पाणी येते. चौपाटीवर चायनिजपासून पुरीभाजी, भेळ अस सर्वकाही मिळण्याच ठिकाण म्हणून चौपाटीची ओळख आहे. परंतु कोरोनामुळे या चौपाटीला ग्रहण लागले. पालिकेने ही चौपाटी आळूच्या खड्डयात हलवली होती. तेथे सर्वच्या सर्व हातागडे बसत नव्हते. त्याकरता तब्बल दोन वेळा हातगाडीवाले मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना भेटले होते. मात्र, रात्री 11 वाजता खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीतच हातागाडीवाल्यांनी चौपाटीवर गाड्या लावल्या.
आज दुपारी 12 वाजता त्याच चौपाटीवाल्यांनी तब्बल दोन तासाच्या प्रतिक्षा घेतल्यानंतर खासदार उदयनराजेंची भेट घेवून त्यांना पेढे आणि हार देवून आनंद व्यक्त केला अन् एकदाची चौपाटील सुरु झाली. साताऱ्याच्या गांधी मैदानावरील भरणारी चौपाटी ही गेल्या एक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही चौपाटी बंद होती. पुन्हा ही चौपाटी आळूच्या खड्डयात हलवण्यासाठी आळूच्या खड्डयाची जागा स्वच्छ करुन तेथे चौकोन आखून देण्यात आले. चौपाटीवरच्या 72 हातगाड्याना जागा देण्यासाठी जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे यांच्याच उपस्थितीत सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर आळूच्या खड्डयात जाण्यासाठी नकार दिला होता. त्यावरुन तब्बल दोन वेळा मुख्याधिकारी बापट यांची भेट हातगाडीवाल्यांनी घेतली होती. काही व्यवसायिकांनी वैतागून दिलेल्या जागेत व्यवसाय सुरु केले. परंतु तेथे व्यवसाय चालत नसल्याने काल कात्री 11 वाजता वैतागुन हातागडे मुळ जागेत लावण्यात आले.
उदयनराजेंनी एका चौपाटीवाल्याची घेतली झाडाझडती
गेल्या दोन दिवसांपासून चौपाटीवरील हातागाडी चालकांनी पुन्हा चौपाटी कशी सुरु करता येईल, यासाठी चाचपणी सुरु केली होती. त्यावेळी त्यांना एका ठिकाणी मार्ग सापडला. उच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालानुसार तो मार्ग आढळून येताच तसेच फक्त चौपाटीवाल्यांवर सक्ती का?, प्रतापसिंह हायस्कूलच्या समोरच असलेल्या फळगाडेवाल्यांना युनियन मंडईत जागा दिलेली असताना ते कसे बसतात आणि त्यांना हटवले नाही चौपाटीवाल्यांनाच हटवले कसे, असा प्रश्न उपस्थित करत चौपाटीवाल्यांनी रात्रीच विचारविनीमय करुन आपल्या टपऱ्या बसवल्या. त्या टपऱ्या टाकत असताना खासदार उदयनराजे यांच्या दृष्टीस रात्री अकरा वाजता त्यांच्या निदर्शनास बाब आली. त्यावेळी त्यांनी खरडपट्टी काढली अन् तुम्हाला काय करायचे ते करा म्हणून निघून गेले.
तब्बल दोन तासाच्या प्रतिक्षेनंतर उदयनराजेंची घेतली भेट
खासदार उदयनराजे यांच्या भेटीकरता सर्व चौपाटीवाले सकाळी 10 वाजताच जलमंदिर पॅलेसवर पोहचले. खासदार उदयनराजेंनी परवानगी दिल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी हार आणि पेढय़ाचा बॉक्स घेवून चौपाटीधारक गेले होते. दोन तासानंतर जेव्हा उदयनराजेंना समजले की चौपाटीवाले जलमंदिर पॅलेस येथे थांबले आहेत. तेव्हा ते जलमंदिर येथे आले अन् त्यांचे इतर काम केल्यानंतर त्यांची भेट घेवून ते बाहेर पडले. स्वच्छता राखा अन् एकाची एकच टपरी लागेल महाराज साहेबांनी जसे सांगितले आहे, तसेच नियम पाळा, कोणतीही चुक करु नका, स्वच्छता हवी आहे. कोर्टाच्या बाजूला बसू नका, एकाचा एकच हातगाडा दिसला पाहिजे. चुकीचे वागला तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व ज्येष्ठ नगरसेवक ऍड. दत्ता बनकर यांनी दिला आहे.









