मुंबई \ ऑनलाईन टीम
लोकल बंद असल्याने मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी झाले त्यामुळे मुंबई लोकलवर काही दिवस निर्बंध लावावाच लागेल. 15 दिवस तरी लोकलची गर्दी कमी करावीच लागणार आहे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा. लोकल बंद असल्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे लोकलमध्ये काही दिवस निर्बंध लावाच लागेल. तसेच दहावीच्या परीक्षावरुन कोर्टाने सरकारकडे विचारणा केली आहे. मात्र दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्षण विभाग ठाम आहे. दोन दिवसात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
मराठा आरक्षणाविषयी विजय वडेट्टीवार म्हणाले की. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यामुळे मराठा आरक्षण रद्द झालं आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारच्या हातात काही राहिले नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








