गुंतवणूकदारांची सावध भूमिका : जागतिक पातळीवरील घटनांचा परिणाम
मुंबई
चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक मोठ्या घसरणीसोबत बंद झाले आहेत. यामध्ये बीएसई सेन्सेक्स तर तब्बल 927 अंकांनी प्रभावीत झाल्याचे दिसून आले आहे.
जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमध्ये अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह बँक यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार अधिक जागृत झाले असल्याचे बुधवारी पहावयास मिळाले आहे. याचा परिणाम भारतीय बाजारातील कामगिरीवरही झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीच्या प्रवासात दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 927.74 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 59,744.98 वर बंद झाला आहे. ही फेब्रुवारी महिन्यातील सर्वात निचांकी कामगिरी राहिली असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये काहीवेळ सेन्सेक्स 991.17 अंकांनी सर्वाधिक नुकसानीत राहिला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 272.40 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक निर्देशांक मागील चार महिन्यांच्या निचांकी पातळीवर जात 17,554.30 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, एचडीएफसी बँक, एचडीएफसी , आयसीआयसीआय बँक आणि टाटा स्टील यांचे समभाग नुकसानीत राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये मात्र सेन्सेक्समध्ये आयटीसीचे समभाग तेजीत राहिल्याचे दिसून आले आहे.
अन्य बाजारांची स्थिती :
आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की , चीनचा शांघाय कम्पोजिट आणि हाँगकाँग यांचे निर्देशांक नुकसानीत राहिले आहेत. युरोपमधील प्रमुख बाजाराचा व्यवहार हा घसरणीत राहिला आहे.









