टाटा स्टील नुकसानीत : जागतिक संकेताचा प्रभाव
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात पुन्हा घसरणीचे सत्र राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये गुरुवारी चौथ्या सत्रात दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 486 अंकांनी कोसळून बंद झाला आहे. यामध्ये जागतिक बाजारांमधील झालेल्या विक्रीच्या दरम्यान निर्देशांक मजबूत ठेवणाऱयांमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीसोबत सेन्सेक्स 485.82 अंकांनी घसरुन निर्देशांक 52,568.94 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजार दिवसअखेर 151.75 अंकांनी घसरुन निर्देशांक 15,727.90 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांपैकी टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक 2 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासोबतच अन्य कंपन्यांमध्ये सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, कोटक बँक आणि डॉ.रेड्डीज लॅब यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत. तर दुसरीकडे शेअर बाजारात टेक महिंद्रा, बजाज ऑटो, पॉवरग्रिड कॉर्प आणि एनटीपीसीसह अन्य कंपन्यांचे समभाग लाभात राहिले असल्याचे पहावयास मिळाले आहे.
जागतिक पातळीवरील वातावरणात नकारात्मक स्थिती राहिल्याने देशातील बाजारात विक्रमी घसरण राहिली आहे. बुधवारच्या सत्रात सेन्सेक्सने 193.58 अंकांसोबत 53,054.76 चा नवा टप्पा प्राप्त केला होता. परंतु हे वातावरण गुरुवारच्या सत्रात राहिले नसल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख घडामोडींचा प्रभाव
आशियातील बाजारात घसरण राहिली आहे. हाँगकाँगच्या हँगसेंगमध्ये 2.50 टक्क्यांची घसरण राहिली आहे. याचाही प्रभाव भारतीय बाजारात राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
चौफेर विक्रीचा दबाव
देशातील शेअर बाजारावर विक्रीचा चौफेर दबाव राहिल्याचे पहावयास मिळाले.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टेक महिंद्रा…. 1059
- बजाज ऑटो… 4076
- एचसीएल टेक.. 976
- पॉवरग्रिड कॉर्प. 231
- एनटीपीसी…… 117
- इंडसइंड बँक.. 1045
- रिलायन्स इन्फ्रा.. 82
- अंबुजा सिमेंट… 360
- कोलगेट…….. 1738
- हॅवेल्स इंडिया 1738
- आयशर मोर्ट्स 2730
- अशोक लेलँड…. 123
- गोदरेज……….. 963
समभाग घसरलेल्या कंपन्या
- टाटा स्टील…. 1189
- सन फार्मा……. 667
- स्टेट बँक………. 424
- आयसीआयसीआय 641
- डॉ.रेड्डीज लॅब्स 5469
- कोटक महिंद्रा. 1732
- हिंदुस्थान युनि 2447
- बजाज फायनान्स 6118
- एचडीएफसी बँक 1520
- ऍक्सिस बँक….. 754
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1502
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2092
- आयटीसी…….. 202
- नेस्ले……….. 17583
- मारुती सुझुकी 7400
- एचडीएफसी.. 2511
- एशियन पेन्ट्स 3040
- टीसीएस……. 3257
- बजाज फिनसर्व्ह 12344
- अल्ट्राटेक सिमेंट 6902
- इन्फोसिस….. 1560
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 776
- टायटन……… 1726
- टाटा मोर्ट्स….. 306
- जेएसडब्लू स्टील 668
- हिंडाल्को……… 383
- ओएनजीसी….. 117
- एबीबी इंडिया 1703









