ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या आणि नीरव मोदीला अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) जोरदार दणका दिला आहे.
ईडीने ट्विटद्वारे संपत्ती हस्तांतरण प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ईडीने संपत्ती निवारण अधिनियम 2002 अंतर्गत हिरे व्यापारी नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि उद्योगपती विजय मल्ल्याची 18 हजार 170.02 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. त्यापैकी 9 हजार 371.17 कोटींची संपत्ती कर्ज बुडवलेल्या सार्वजनिक बँकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.









