अलिशान गाडीतून केली ही चोरी
प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर येथील चैनीसाठी तीन बोकड व एक शेळी चोरणाऱ्या पाच चोरटयांना इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. विशेष म्हणजे या चोरटयांनी दोन लाख रुपये किंमतीच्या अलिशान गाडीतून ही चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीसांनी ही गाडी हस्तगत केली आहे.
अजित पांडूरंग सुर्वे (२९,रा.नरसिंहपूर), अजय रघुनाथ झीमुर (२९), अभिषेक कैलास गोतपागर (२३), धनंजय आनंदा कांबळे(२९), किरण दिपक लोहार (२३, सर्व रा. इस्लामपूर) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी या पाच जणांनाही अटक केली आहे.
गेल्या काही दिवसात शेळी चोरीचे प्रमाण वाढले असून पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत पथक शोध घेत होते. त्यावेळी या पाच जणांनी चोरी केल्याचे पुढे आले. पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण साळुखे, पोलीस हवलदार दिपक ठोंबरे, पोलीस नाईक शरद जाधव, अरुण पाटील, प्रशांत देसाई, पोलीस कॉन्स्टेबल अलमगिर लतिफ, अमोल सावंत, विनय माळी यांनी या चोरटयाना अटक केली. त्यांनी नरसिंहपूर येथून ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Previous Articleराहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा; म्हणाले…
Next Article महाराष्ट्रात १० हजार ६९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद








