वृत्तसंस्था / मुंबई :
देशातील सर्वात प्रसिद्ध व्यावसायिक आणि सर्वाधिक कालावधीपर्यंत बजाज समूहाचे अध्यक्ष राहिलेले राहूल बजाज यांच्या कार्यात बदल होणार आहे. सध्या राहूल बजाज कंपनीच्या कोणत्याही निर्णयात प्रत्यक्षपणे सहभाग नेंदवणार नाहीत. आता संचालक म्हणून कार्यरत असणारे बजाज येत्या 31 मार्च 2020 नंतर कंपनीच्या संचालक मंडाळावर बिगर कार्यकारी संचालकांची भूमिका बजावणार आहेत.
राहूल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी एका मारवाडी घरात बंगालमध्ये झाला. (स्वातंत्र्यापूर्वीचे पश्चिम बंगाल) भारतीय स्वातंत्र्य लढय़ातील सेनानी आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांचे ते नातू आहेत. लहानपणापासून व्यावसायिक घराण्याशी संबध आल्याने बजाज यांच्या रक्तात व्यवसायच असल्याचे दिसून येते.
दिल्ली विद्यापीठातील सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इकॉनॉमिक ऑनर्स केल्यानंतर राहूल बजाज यांनी तीन वर्षांसाठी बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीत प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे 60 च्या दशकात त्यांनी अमेरिकेतील हार्वर्डमधील बिझनेस स्कूलमधून एमबीएची डिग्री घेतली.