करमाळा / प्रतिनिधी
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सह.साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यातील कंदर, कविटगाव, पांगरे, शेलगाव, वांगी १ गावचा दौरा करुन अतिरीक्त ऊसासंदर्भात निर्माण झालेल्या अडचणी समजुन घेतल्या यावेळी मोहिते पाटील यांनी कंदर व पांगरे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊसाची पहाणी करुन ऊस लागवड, कालावधी, ऊस बेणे यासंबधी माहिती घेतली.
यावेळी संबधित गावातील शेतकऱ्यांनी आपल्या ऊसासंदर्भात असलेल्या अडचणी चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्यापुढे मांडल्या त्यावर मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न सोडवताना कोणतेही राजकारण मधे येवु देणार नसुन शेतकऱ्यांनी कारखान्याकडे दिर्घ मुदतीचे करार करावेत करार केलेल्या शेतकऱ्यांचा ऊस शेतात राहीला तर त्याच्या ऊसाचे पैसे देण्याची जबाबदारी कारखान्याची राहील असे आश्वस्त केले.
यावेळी बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले फेब्रुवारी पासुन करमाळा तालुक्यात अतिरिक्त ऊसाच्या परिस्थितीनुसार 200 ऊसतोड टोळ्या पाठवण्याचे नियोजन करणार असुन शेतकऱ्यांनी ऊसाच्या अतिरीक्त प्रश्नावर घाबरुन जाण्याचे कारण नाही. येथुन पुढे ही जे शेतकरी कारखान्याकडे करार करतील त्यांचा ऊस प्राधान्याने गाळप करण्याची जबाबदारी सहकार महर्षी कारखान्याची असेल शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करताना अडसाली उसाबरोबरच पुर्वहंगामी ऊसाची लागवड करावी जेणेकरुन अडसाली, खोडवा व पुर्वहंगामी ऊसाच्या हार्वेस्टींगचे नियोजन करुन प्रोग्रॅम राबवता येईल.
यावेळी जि.प अध्यक्ष अनिरुध कांबळे, आदिनाथ सह.सा. कारखान्याचे व्हाईस चेअरमन शहाजीराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन शिवाजीराव बंडगर, पंचायत समिती सभापती अतुल पाटील, आदिनाथचे मा. व्हाईस चेअरमन नानासाहेब लोकरे, हरिभाऊ मंगवडे, अजित तळेकर, उदयसिंह मोरे पाटील, अमरजित साळुंखे, बंडु माने, डॉ. अमोल घाडगे, कविटगावचे सरपंच शिवाजी सरडे, शेलगावचे सरपंच अमर ठोंबरे पाटील, पांगरेचे उपसरपंच गणेश वडणे, आदिनाथचे मा.संचालक संजय खाडे, बाळासाहेब बेरे, नरेंद्र ठाकूर, ज्ञानेश पवार संबधित गावातील शेतकरी आदि उपस्थित होते.