प्रतिनिधी / मिरज
जनावरांच्या गोठ्यात वैरण टाकण्यासाठी आलेल्या चुलत भावाच्या पत्नीचा दिराने विनयभंग केला. मिरज तालुक्यातील खटाव गावात ही घटना घडली. याबाबत पीडित महिलेने मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, शंकर परसू नाईक (वय 25) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिला आणि शंकर नाईक हे एकाच कुटुंबातील आहेत. रविवारी रात्री साडेदहा वाजता पीडित महिला ही जनावरांना वैरण टाकण्यासाठी गोठ्यात आली होती. त्यावेळी शंकर हा देखील गोठ्यात शिरला. त्याने गोठ्याचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर पीडित महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. या आरोपीविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








