उपाध्यक्षपदी ऍड. सचिन शिवण्णावर आणि ऍड. सुधीर चव्हाण
प्रतिनिधी/ बेळगाव
नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या बार असोसिएशनच्या चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ऍड. प्रभू यतनट्टी यांनी बाजी मारली आहे. तर उपाध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत ऍड. सचिन शिवण्णावर आणि ऍड. सुधीर चव्हाण हे विजयी झाले आहेत. जनरल सेपेटरी पदाच्या निवडणुकीत ऍड. गिरीश एन. पाटील यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे. रात्री 12.30 वाजता याचा निकाल लागला. त्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्मयाची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत भर पावसात विजयोत्सव साजरा केला.
बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक ही नेहमीच चुरशीची होत असते. या निवडणुकीकडे साऱयांच्याच नजरा लागलेल्या असतात. अध्यक्षपदासाठी ऍड. प्रभू यतनट्टी आणि ऍड. डी. एम. पाटील हे निवडणूक लढवत होते. यामध्ये ऍड. प्रभू यतनट्टी यांनी विजय संपादन केला आहे. विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. उपाध्यक्षपदासाठी ऍड. सचिन शिवण्णावर यांनी अधिक मते घेऊन ते विजयी झाले. तर उपाध्यक्षपदाच्या दुसऱया जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. या चुरशीमध्ये ऍड. सुधीर चव्हाण यांनी बाजी मारली आणि ते विजयी झाले.

जनरल सेपेटरीपदासाठीही मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र गिरीश एन. पाटील यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे. जाईंट सेपेटरी पदासाठी चार जण रिंगणात होते. त्यामध्ये बंटी आर. कपाई यांनी या चुरशीच्या निवडणुकीत विजय संपादन केला आहे. त्यांनी विजय मिळविल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. महिला प्रतिनिधीसाठी दुरंगी लढत होते. त्यामध्ये ऍड. पूजा पाटील यांनी बाजी मारली असून त्यांनी 817 मते घेवून विजय संपादन केला आहे.
कमिटी सदस्य पदाच्या पाच जागांसाठी 13 जण रिंगणात होते. त्यामधील ऍड. पाटील महांतेश यांनी सर्वात जास्त मते मिळवून विजय संपादन केला. त्या खालोखाल ऍड. अभिषेक उदोशी, ऍड. आदर्श पाटील, ऍड. इरफान बयाळ, ऍड. प्रभाकर पवार हे विजयी झाले आहेत.
1622 मतदारांनी बजावला हक्क
बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये यावषी 2091 मतदार होते. यामधील 1622 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पहिल्यांदाच इतक्मया मोठय़ा प्रमाणात मतदान झाले. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर 6.30 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. प्रारंभी जाईंट सेपेटरी आणि जनरल सेपेटरी पदाच्या मतमोजणीला सुरूवात झाली. पहिला निकाल जनरल सेपेटरी पदाचा लागला तर त्यानंतर जाईंट सेपेटरी पदाचा निकाल लागला. त्यानंतर कमिटी सदस्य पदाचा निकाल लागला होता.
फटाक्मयाची आतषबाजी
निकाल लागताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्मयाची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला. याचबरोबर गुलालाची उधळणही केली. पाऊस पडत होता. मात्र भर पावसातही समर्थकांनी आपला आनंद व्यक्त केला.
ऍड. पी. के. पवार अकरावेळा विजयी
ऍड. पी. के. पवार हे कमिटी सदस्य पदावर तब्बल अकरावेळा विजयी झाले आहेत. त्यांनी एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे.









