मुंबई/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. यांनतर पंकजा मुंडेंचे समर्थकही चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांना आशा होती की प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल पण विस्तारावेळी प्रीतम यांचं नाव यादीमध्ये नसल्याने समर्थक चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी पंकजा मुंडे यांनी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी केली. दरम्यान पंकजा यांनी आज पत्रकार परिषद घेत नाराजीच्या अफवांना पूर्णविराम दिला.
दरम्यान, मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या, असं सांगत पंकजा यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच मंत्रिपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ते योग्यच होतं, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. तसेच नवीन मंत्र्यांना शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.








