वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
काही वेळा आपले बँकेचे व्यवहार करताना गडबडीत किंवा अन्य काही कारणांमुळे आपले पैसे अन्य बँक खात्यात जमा होतात. यामुळे ते परत मिळवण्यासाठी विविध पर्याय वापरावे लागतात. तर काही ग्राहकांना या संदर्भात माहिती मिळतच नाही. त्यामुळे अशा समस्या निर्माण झाल्यास विविध ग्राहकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु अशा प्रकारची स्थिती या पुढे झाल्यास चिंता करण्याची गरज नाही. कारण चुकीच्या खात्यात जमा झालेली रक्कम परत मिळविणे होणार आहे सोपे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार चुकीच्या खात्यात पैसे जमा झाल्यास संबंधीत बँकेकडून या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्याची गरज असते. त्यासाठी योग्य तो मार्ग उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.









