ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रशिया आणि युक्रेनमध्ये मागील 20 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाची धग आता अधिक तीव्र झाली आहे. युक्रेनचे सैन्य धैर्याने रशियन सैन्याचा सामना करत आहेत. दरम्यान, रशियन सैन्याला शस्त्रास्त्रांची टंचाई जाणवू लागल्याने त्यांनी चीनकडे मदत मागितली होती. चीननेही रशियाला मदत करण्यास होकार दर्शवला असून, चीन रशियाला पैसा आणि शस्त्रास्त्रे पुरविणार आहे.
रशियाला मदत केल्यास चीनला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेने दिला होता. मात्र तरीही चीन रशियाला पैसा आणि शस्त्रास्त्रे पुरवणार आहे. युक्रेनविरोधात जगातील दोन महासत्ता एकत्र आल्याने युक्रेनची चिंता आता वाढली आहे. अमेरिका आणि ब्रिटनमधील संरक्षणविषयक तज्ञांनी रशियाकडे 10 ते 14 दिवस पुरेल एवढाच शस्त्रसाठा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे रशियन सैन्याला युक्रेनमध्ये पुढे जाण्याची शस्त्रास्त्रांची गरज आहे.
युक्रेनवरील हल्ल्याच्या काही दिवस आधीच रशियाने चीनसोबत एक करार केला होता. त्यामध्ये चीनने रशियाचा गहू खरेदी करण्यास तयारी दर्शविली होती.









