ऑनलाईन टीम / लडाख :
पूर्व लडाखच्या सीमावादावर भारत आणि चीनच्या लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांच्यात सकारात्मक बैठक झाली. त्यामध्ये दोन्ही देशांनी लडाखमधील सीमारेषेवरून सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले आहे. भारतीय लष्कराकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावरून मागील पाच आठवड्यापासून दोन्ही देशात तणावाचे वातावरण होते. त्यातच पंधरा जूनला झालेल्या भारत-चीन हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला होता. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी नियंत्रण रेषेच्या पलीकडे चीनच्या मोलडो भागात दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली.
बारा तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेपासून आपले सैन्य मागे घेण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार आता चीन लडाखमधील सीमारेषेवरून आपले सैन्य मागे घेईल. त्यानंतर भारतालाही आपले सैन्य मागे घ्यावे लागेल.









