ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये चीनपासून जगाला असलेल्या धोक्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
आर्थिव आणि लष्करी सामर्थ्याच्या जोरावर चीनची आक्रमकता जगाला धोकादायक ठरत आहे. चीनचा प्रशांत महासागरात अनावश्यक वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न, इतर देशांच्या सीमांवर अतिक्रमण या मुद्यांवर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी चीनविरोधात एकत्र असल्याचा चीनला थेट इशाराच दिला. चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करतील, असा इशारा सुगा यांनी दिला.









