ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना विषाणू चीनमधून आला, हे अमेरिका कदापि विसरू शकत नाही. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची संधी मिळाल्यास अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व कायमचे संपवून टाकेन, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
न्यूपोर्ट व्हर्जिनिया येथील एका निवडणूक प्रचारसभेत ट्रम्प बोलत होते. ट्रम्प म्हणाले, चीनने कोरोना विषाणू पसरवून संपूर्ण जगाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. चीनकडून आलेल्या विषाणूचा मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 72 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली असून, 2 लाखांपेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
अमेरिका आणि चीन यांचे संबंध पूर्वीसारखे राहण्याची आता शक्यता नाही. पुन्हा सत्तेवर आल्यास अमेरिका चीनवरील अवलंबित्व पूर्णपणे संपवेल, अशी ग्वाही ट्रम्प यांनी दिली.