ऑनलाईन टीम / बीजिंग :
कोरोना संकटातून सावरणाऱ्या चीनमध्ये आता ब्यूबोनिक प्लेगचा धोका वाढत आहे. चीनच्या यून्नान प्रांतातील मेंघाई काउंटीत राहणाऱ्या एका तीन वर्षीय मुलाला या प्लेगचा फटका बसला आहे. त्या मुलाला मागील आठवड्यात प्लेगची लागण झाली होती. रविवारी त्याला पुष्टी झाली. या मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, यून्नानमध्ये मागील आठवड्यात या प्लेगची लागण झालेले तीन उंदीरही मृतावस्थेत आढळले होते. त्यामुळे साथीचे रोग टाळण्यासाठी चिनी प्रशासनाने चौथ्या स्तरावर आणीबाणी जाहीर केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी उत्तर मंगोलियात ब्यूबोनिकप्लेगच्या 22 घटना घडल्या. त्यानंतर चीनमध्ये तिसऱ्या स्तरावरील इशारा देण्यात आला होता. जुलै महिन्यात खोवाडा प्रांतात या प्लेगचे आणखी दोन रुग्ण नोंदवण्यात आले. त्यानंतर 140 हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी उत्तर मंगोलिया भागात एका मेंढपाळाला प्लेगची लागण झाली होती.
त्यानंतर स्थानिक पातळीवर प्राण्यांची शिकार करू नका आणि मांस खाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले होते. या प्लेगला रोखण्यासाठी चीन सरकारचे प्रयत्न सुरू केले आहेत.









