बीजिंग
चीनच्या गुईझोऊ प्रांतातील एका नदीत बोट उलटल्याने आठ जणांचा मृत्यू झाला असून सात जण बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा विशेष मोहिमेद्वारे शोध घेतला जात आहे. हा अपघात शनिवारी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ल्युपांशुई शहरातील जंगके शहरात घडला. या बोटीची क्षमता 40 प्रवाशांची वाहतूक करण्याची होती. मात्र, दुर्घटनेवेळी त्यात किती लोक होते याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. प्रशासकीय अधिकारी अजूनही प्रवाशांची नेमकी संख्या तपासत आहेत. या दुर्घटनेनंतर विशेष शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.









