ऑनलाईन टीम / बीजिंग :
कोरोनाच्या भीतीने चीनने जगातील 19 देशातून होणारी खाद्यपदार्थांची आयात रोखली आहे. चायना जनरल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ कस्टम्सने तेथील स्थानिक मीडियाला यासंदर्भात माहिती दिली.
चायना जनरल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ कस्टम्सने म्हटले आहे की, चीन जगातील 19 देशातील 56 कोल्ड चेन फूड कंपन्यांकडून हजारो टन खाद्यपदार्थ आयात करते. या 56 कंपन्यांपैकी 41 कंपन्यांनी आपली उत्पादने चीनकडे न पाठविण्याचा एकत्रित निर्णय घेतला होता. त्यानंतर चीन सरकारने त्यांची आयात बंद केली आहे.
19 देशांतील 56 कंपन्यांकडून चीन सी फूड्स, चिकन यासारखे गोठवलेले खाद्यपदार्थ मागविते. कोल्ड-चेन फूड म्हणजेच अन्न सुरक्षित राहण्यासाठी हे अन्न फ्रिजमध्ये पाठवले जाते. अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांमुळे चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे चीनने खबरदारी म्हणून या पदार्थांच्या आयातीवर बंदी घातली आहे.









