ऑनलाईन टीम / बीजिंग :
‘कॅनसियो’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकष येण्यापूर्वीच चीनने आपल्या सैनिकांना ही कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यास सुरुवात केली आहे.
‘कॅनसियो’ ही कोरोना प्रतिबंधक लस चिनी लष्कराच्या मदतीने बनवण्यात आली आहे. ही लस तयार करण्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असून, त्याला मान्यताही मिळाली नाही. तरी देखील चीन लष्करातील सैन्याला सरसकट ही लस देत आहे.
चीनी सैनिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती आणि जैविक शक्ती चांगली असल्याने त्यांना दोन टप्प्यातील चाचणी झालेली लस देण्यात येत असल्याचे चीनचे पॉलीसी सेंटरचे संचालक ॲडम नी यांनी म्हटले आहे. चिनी सैन्याच्या मेडिकल सायन्स प्रमुख चेन वेई यांनी ‘कॅनसियो’ ही लस विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.









