ऑनलाईन टीम / काठमांडू :
मागील 60 वर्षांपासून नेपाळच्या हद्दीत असलेले रुई हे गाव चीनने ताब्यात घेतले आहे. नेपाळचे वृत्तपत्र असलेल्या अन्नपूर्णाने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. मात्र, चीनच्या या कृत्यावर नेपाळ अजूनही शांत आहे.
रुई हे गाव तीन वर्षांपूर्वी तिबेटच्या स्वायत्त क्षेत्राचा भाग झाला आहे. या गावात ७२ घरे असून, या नेपाळच्या नकाशातही या गावाचा समावेश आहे. हा गाव आता चीनने ताब्यात घेतला असून, गावाची हद्द दाखवणारे खांब चीनने हटवले आहेत.
नेपाळचे इतिहास तज्ज्ञ रमेश धुंगल म्हणाले, २०१७ पर्यंत रुई आणि तेईगा ही गावे नेपाळच्या गोरखा जिल्ह्यातील उत्तरी भागात आहेत. या गावाला नेपाळने युद्धात कधी गमावले नाही. तसेच तिबेटसोबत कोणत्याही करारातही हे गाव नव्हते. नेपाळने सीमा भाग दर्शवताना केलेल्या चुकीमुळे रुई आणि तेईगा गावावरील ताबा गमावला आहे. नेपाळच्या गोरखा महसूल कार्यालयात या गावातून महसूल जमा केला असल्याची नोंद आहे. त्याशिवाय गावाबाबत अन्य नोंदीदेखील उपलब्ध आहेत.
चुमुबरी ग्रामीन नगरपालिकेचे स्थानिक नेते वीर बहादूर लामा म्हणाले, काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे समदो आणि रुई गावामध्ये सीमा दर्शवणारा स्तंभ लावण्यात आला. त्यामुळे नेपाळला या गावावरील ताबा गमवावा लागला.









