ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत नवे – नवे प्रयोग करण्यात चीनचा अग्रेसर आहे. याच चीनची भिंत जगातील सात आश्चर्यापैकी एक. याच चीनने आता आणखी एक प्रयोग करत अवघ्या २८ दिवसात १० मजली इमारत बांधली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असला तरी अनेकांना यावर विश्वास बसत नाही. मात्र हा व्हिडिओ पाहता सोशल मीडियावर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
चीनने चांग्शा नामक शहरात ही इमारत बांधली आहे. या इमारतीचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करत जगाला चीन ने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. चीन मधील ब्रॉड ग्रुपने ही कामगिरी केली आहे. या उभारणीसाठी डेव्हलपर्सने ‘लिव्हिंग बिल्डिंग सिस्टम’चा वापर केला आहे.
बोल्ट आणि मॉड्यूलरच्या सहाय्याने ही इमारत उभारली आहे. इमारत मॉड्यूल तयार करण्यात ब्रॉड ग्रुपने आपले वेगळेपण दाखवत हे तंत्रज्ञान वापरणे खूप सोपं असल्याचे दाखवून दिले आहे. ही १० मजली इमारत उभारल्यानंतर त्यात वीज आणि पाण्याची ही जोडणी करण्यात आली आहे.










