ऑनलाईन टीम / स्टॉकहोल्म :
चीनकडून आयात करण्यात आलेले कोरोना टेस्टिंग किट सदोष असल्याने स्वीडनमध्ये साधा सर्दी, ताप असलेल्या 3700 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे स्वीडन अडचणीत आले आहे.
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या या रुग्णांवर कोरोनाचे उपचारही सुरू करण्यात आले. मात्र, हे रुग्ण पूर्णपणे ठणठणीत असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या लक्षात आले. त्यानंतर या रुग्णांच्या सर्दी, तापाची कारणे वेगळी असल्याचे समोर आले.
चीनमधून आयात करण्यात आलेले पीसीआर कोरोना चाचणी किट सदोष असल्याने हा घोळ झाल्याचे स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने केलेल्या तपासणीमध्ये समोर आले. चीनमधील बीआयजी जेनोमिक्स कंपनीकडून स्वीडनने हे टेस्ट किट आयात केले होते.









