बीजिंग / वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वी कोसळलेल्या चीनच्या विमानाचा दुसरा ब्लॅकबॉक्स सापडला आहे. या अपघातात विमानातील सर्व 132 प्रवाशांनी जीव गमावला होता. या दुसऱया ब्लॅकबॉक्समुळे विमान अपघाताची कारणे अधिक स्पष्टपणे समजणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. पहिला ब्लॅकबॉक्सही सापडला होता. तथापि. तो मोडलेल्या अवस्थेत सापडल्याने त्यातून विशेष माहिती मिळू शकली नव्हती. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश चिनी प्रशासनाने दिले आहेत.









