अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये रेल्वेच्या 5 उड्डाणपूलांच्या निर्मितीसाठी कापल्या जाणाऱया 300 वारसा (हेरिटेज) वृक्षांचे मूल्य प्राणवायू आणि अन्य उत्पादनांच्या दृष्टीकोनातून 2.2 अब्ज रुपये आहे. जिवंत वृक्ष प्रकल्पापेक्षा अधिक लाभदायक असल्याचे तज्ञांच्या एक समितीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.
परिपक्व होण्यास दशकं किंवा शतकं लागणारा वारसा वृक्ष आकाराने अत्यंत मोठा असतो. वारसा वृक्ष समाज आणि पर्यावरणाची सेवा करतो आणि त्यांचे आकलन प्राणवायू, मॅक्रो न्यूट्रिशिएंट, कंपोस्ट आणि अन्य जैव खतांसह विविध घटकांच्या आधारावर केले जाऊ शकते, असे तज्ञांच्या समितीने सरन्याधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मत मांडले आहे.
वारसा वृक्षाच्या सर्व लाभांची किंमत जोडल्यास आणि वृक्षाच्या उर्वरित आयुष्याशी त्याचा गुणाकार केल्यास एका वृक्षाची वर्तमान किंमत 74,500 रुपये प्रतिवर्ष होते. याचाच अर्थ 300 वृक्षांना 100 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगू दिल्यास ती 2.2 अब्ज रुपयांचा लाभ करून देतील. 300 वृक्षांच्या भविष्याची हीच किंमत असल्याचे समितीने नमूद केले आहे.
59.2 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा विचार केल्यास ते दशकात गर्दीचे होतील आणि त्यांचे रुंदीकरण करावे लागणार असून अशाप्रकारे 4056 वृक्षांची तोड करावी लागणार आहे. अशा स्थितीत 100 वर्षांमध्ये वृक्षांच्या उत्पादनांची किंमत 30.21 अब्ज रुपये असेल. पर्यावरणीय आपत्ती टाळण्यासाठी नियमित चौकटीबाहेरील तोडग्याची गरज असल्याचे समितीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.









