भारताचा चीनवर सायबर सर्जिकल स्ट्राईक
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताने पुन्हा एकदा चीनवर मोठा सायबर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱया 54 चिनी अ?Ÿप्सवर बंदी घातली आहे. गुगलच्या प्ले स्टोअरसह अन्य प्लॅटफॉर्मवरून ही ऍप्स काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. बंदी घातलेल्या ऍप्सच्या यादीत ब्युटी कॅमेरा आणि स्वीट सेल्फी एचडी सारख्या लोकप्रिय अ?Ÿप्सचा समावेश आहे. तसेच सेल्फी कॅमेरा, इक्विलायझर, बास बूस्टर, कॅमकार्ड फॉर सेल्सफोर्स अँट, आयसोलँड 2ः अ?Ÿशेस ऑफ टाईम लाईट, व्हिवा व्हिडीओ एडिटर, टेनसेंट एक्सरिव्हर, ऑनमोजी चेस, ऑनमोजी अरेना, अ?Ÿपलॉक आणि डय़ुएल स्पेस लाईट ही महत्त्वाची ऍपही आहेत.
भारताने यापूर्वीही चीनच्या ऍप्सवर कारवाई केलेली आहे. आता पुन्हा एकदा आणखी काही ऍपवर बंदी घालत भारताने मोठे पाऊल उचलले आहे. गेल्या काही दिवसांपासून माहिती तंत्रज्ञान विभागाने या ऍपवर विशेष नजर ठेवली होती. त्यानंतर बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला. आयटी मंत्रालयाने केलेल्या तपासणीत हे सर्व ऍप्स भारतीय वापरकर्त्यांचा डेटा चीन आणि इतर देशांना पाठवत असल्याचे आढळून आले आहे. या ऍप्सच्या माध्यमातून युजर्सचा डेटा परदेशी सर्व्हरपर्यंतही पोहोचत होता.
भारत सरकारने यापूर्वी 29 जून 2020 रोजी चिनी ऍप्सवर बंदी घातली होती. 29 जून 2020 रोजी पहिला डिजिटल स्ट्राईक करताना 59 ऍप्सवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर 27 जुलै 2020 रोजी 47 ऍप्स, 2 डिसेंबर 2020 रोजी 118 आणि नोव्हेंबर 2020 रोजी 43 ऍप्सवर बंदी घालण्यात आली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69ए अंतर्गत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या सर्व ऍप्सवर बंदी घातली आहे.









