वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारत प्रशांतीय क्षेत्रात चीनचा आक्रमक विस्तारवाद आणि हट्टाग्रह हा सर्व जगाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे, असे अमेरिकेच्या पेंटॅगॉनने स्पष्ट केले आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या चार देशांनी स्थापन केलेल्या क्वॉर्ड या संघटनेच्या बैठकांमध्ये या विषयावर सातत्याने चर्चा होत असते. क्वॉडचे सदस्य देश एकत्रितरित्या या विषयावर कार्यरत आहेत. असे प्रतिपादन करण्यात आले.
24 सप्टेंबरला अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी क्वॉड नेत्यांची बैठक आयोजित केली होती. भारत प्रशांतीय क्षेत्र मुक्त खुले, सर्वसमावेशक आणि स्वतंत्र असावी. त्यावर कोणाचीही मक्तेदारी किंवा एकाधिकार असू नये. या सागरी क्षेत्रात प्रवेश करण्याचा अधिकार सर्व देशांना असावा यासाठी क्वॉड प्रयत्नशील आहे. वेळ प्रसंगी चीवन दबाव आणण्याचेही कार्य या संघटनेला करावे लागणार आहे, अशी माहिती पेंटॅगॉनचे वृत्त सचिव जॉन किर्बी यांनी दिली.
क्वॉड ही संघटना केवळ चीनला रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेली नाही. तिची उद्दिष्टय़े यापेक्षा व्यापक आहेत. चारही सदस्य देशांमध्ये विविध विषयांवर सहकार्य असावे. तंत्रज्ञानाचे अदानप्रदान व्हावे, जगाची शांतता आणि सुरक्षितता सुनश्चित व्हावी, इत्यादी अनेक उद्देशांशी ही संघटना आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.









