पंतप्रधानांवर खोटे बोलण्याचा केला आरोप : पँगोंग सरोवराला दिली भेट
वृत्तसंस्था/ लेह
लडाखमध्ये चिनी सैन्य घुसल्याचे तेथील लोकांनीच मला सांगितले आहे. स्थानिक लोकांना आता ग्रेजिंग लँड (चराऊ कुरण)मध्ये जाता येत नाही. तर दुसरीकडे पंतप्रधान एक इंच जमीन चीनने बळकावली नसल्याचे सांगत आहेत, परंतु हे सत्य नाही. लडाखमधील कुठल्याही व्यक्तीला विचारल्यास सत्य काय ते कळेल असे म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.
लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. लडाखला देण्यात आलेल्या दर्जावरून ते नाराज आहेत. लडाखवासीयांना प्रतिनिधित्व हवे असून येथे बेरोजगारीची समस्या आहे. लडाखचे प्रशासन नोकरशाहीद्वारे नको तर जनतेच्या प्रतिनिधींकडून चालविले जावे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल हे स्वत:चे वडिल आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त लडाख येथे पोहोचले आहेत. येथील पँगोंग सरोवराच्या ठिकाणी जात राहुल यांनी राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारत जोडो यात्रेवेळीच लडाखला जाण्याची इच्छा होती. परंतु लॉजिस्टिकल कारणांमुळे ते शक्य झाले नव्हते. लेह अन् पँगोंगनंतर कारगिललाही देखील भेटणार आहे. तेथील लोकांच्या भावना काय आहेत हे जाणून घेणार असल्याचे राहुल यांनी सांगितले आहे.
सर्वात सुंदर ठिकाण
पँगोंगविषयी राजीव गांधी यांनी हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असल्याचे सांगितले हेते असे राहुल यांनी शनिवारी नमूद पेल होते. राहुल हे शनिवारी सकाळ राइडल लुकमध्ये पँगोंग सरोवरासाठी रवाना झाले होते. राहुय यांच्या या अॅडव्हेंचरस रोड ट्रिपची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यादरम्यान राहुल हे केटीएम बाइक आणि स्पोर्ट्स हेल्मेटमध्ये लडाखच्या रस्त्यांवर बाइक चालविताना दिसून आले होते.









