प्रतिनिधी / सरवडे
सरवडे येथील वेदांत रणजित खोराटे या साडेचार वर्षांच्या बालकाचा दिवाळी सणातच आकस्मिक झालेला मृत्यू सरवडे गावासह परिसरात मनाला चटका लावणारा ठरला. खेळकर व निरागस वेदांतच्या अचानक जाण्याने गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
येथील ठेकेदार बापूसो जयसिंग खोराटे यांचा नातू व रणजित बापूसो खोराटे यांचा मुलगा वेदांत याच्या काल रात्री अचानक सौम्य स्वरुपात पोटात दुखू लागले. त्याला तात्काळ दवाखान्यात नेले. औषधे घेतल्यानंतर त्याला बरे वाटले. घरी आल्यावर तो खेळू लागला तर फटाकेही वाजवले. रात्री तो नेहमी प्रमाणे झोपी गेला. परंतु पहाटे तीनच्या सुमारास तो अस्वस्थ झाला.
उपचारासाठी त्याला मुरगूड येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हसता खेळता वेदांत अचानक मृत झाल्याचे समजताच घरच्यासह अनेकांना धक्का बसला. कायम हसत खेळत असणार्या वेदांतचा छोट्याश्या दुखण्याने अचानक पणे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, पणजी,आत्या व मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार ८ नोव्हेंबर रोजी आहे.
किल्ला पाहून अनेकजण गहिवरले
वेदांत सर्व लहान मुलांच्यात कायम खेळत असे, त्याला गायी, म्हैशी, बैल फार आवडायचे. कोणाच्याही घरात हे प्राणी दिसले की तो तिथेच तासनतास रमायचा. दिवाळीत त्याने खूप फटाकेही वाजवले तर दारात मामा चंद्रकांत मोरस्कर (फौजी) यांना घेऊन सुंदर किल्ला देखील बांधला आहे. आज त्याच्या मृत्यूनंतर घरी भेटायला येणार्या प्रत्येकाला दारातील त्याने बांधलेला किल्ला बघून गहिवरून येत होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









