फुग्याप्रमाणे मोठं होतंय डोकं
आई आपल्या मुलांची कुठल्याही स्थितीत काळजी घेत असते. एका महिलेची मुलगी एका उपचाररहित आजारासह जन्माला आली आहे. एडाल्गिसा सोरेस एल्वज या महिलेने एका अशा मुलीला जन्म दिला आहे, जिच्या डोक्याचा आकार वेगाने वाढत चालला आहे. मुलीच्या आरोग्याबद्दल तिची आई चिंतेत आहे, मुलीची सर्वप्रकारे देखभाल ती करत आहे, तरीही काही जण तिच्या निर्धाराची चेष्टा करत तिचे मनोबल तोडण्याचा प्रकार करत आहेत.

एडाल्गिसा सोरेस यांना एकूण 3 मुले आहेत, यातील ग्रॅजिली नावाची मुलगी इतरांपेक्षा वेगळी आहे. तिला जन्मजात एक अजब आजार आहे, या आजारामुळे तिच्या डोक्याचा आकार वेगाने वाढत चालला आहे. मुलीला डायड्रोसेफालस नावाचा आजार आहे, यामुळे तिच्या मेंदूत फ्लुइडची निर्मिती होत राहते. यामुळे तिच्या मेंदूतील प्रेशन वाढतो आणि कवटी देखील डॅमेज होऊ शकते. ही मुलगी चालू शकत नाही तसेच तिला बोलता देखील येत नाही. याचबरोबर तिची दृष्टीक्षमताही गेली आहे.
29 वर्षीय महिलेने या आजारावरून जागरुकता निर्माण करण्यासाठी मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तर मुलीच्या आकारावरून टिप्पणी केली, तर काहींनी तिच्या आईची चेष्टा केली. परंतु काही जणांनी महिलेचे कौतुक केले आहे.









